Home बुलढाणा संजय गांधी निराधार योजनेचे रखडले अनुदान लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर:...

संजय गांधी निराधार योजनेचे रखडले अनुदान लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर: तहसीलदार प्रशांत पाटील यांनी लक्ष देण्याची गरज

0
105

संग्रामपूर: प्रतिनिधी अमोल भगत

राज्य आणि केंद्र शासनाच्या म ध्यिमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निरधार व श्रावण बाळ योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, दुर्बल घटक, विधवा, व्योवृद्ध आणी अनाथ असलेल्या मुले व मुलींना लाभ मिळत असतो परंतु गेल्या दोन महिन्यापासून लाभार्थी वंचित आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितामुळे या योजनेचे अनुदान रखडले असल्याचे बोलले जात आहे. तसेच शासकीय योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ही आर्थिक लाभाची योजना असल्याने संजय गांधी निराधार अनुदान योजना
अनेक निराधारांना या योजनेचा मोठा दिलासा मिळतो. परंतु ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्याचे अनुदान संग्रामपूर येथील संबंधित विभागात प्राप्त न झाल्यामुळे लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. आपला उदरनिर्वाह कसा करावा, ही चिंता लाभार्थ्यांना लागलेली असून, यात वयोवृद्ध लाभार्थ्यांचे कंबर्डे रोज रोज बँकेत जाऊन व संजय गांधी निराधार ारत योजनेच्या कार्यालयात चकरा मरात आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना विचारत आहे की
साहेब आमचे अनुदानाचे पैसे बँकेत का जमा झाले नाहीत आणि
दुर्बल घटक संजय गांधी निराधार योजनाअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करतात, प्राप्त झालेल्या त्या पात्र अर्जावर शासकीय अधिकाऱ्याकडून मंजुरी दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्याकरिता गृह चौकशी अहवालाकरितात काही तलाठ्याकडून तर मानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित असून लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संजय गांधी निराधार विभागात तालुक्यातील श्रावण बाळ ११ हजार

५०८ आणी संजय गांधी ४ हजार २६ असे एकूण १५ हजार ५३४ पात्र लाभार्थी ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्याचे अनुदानासाठी प्रतीक्षा करत आहे.
संग्रामपूर तहसील कार्यालयात दोन महिन्यापूर्वी नवीन आलेले तहसीलदार प्रशांत पाटील यांनी या संबंधित विभागाकडे लक्ष देण्याची गरज तसेच या समस्या बाबत संबंधित वरिष्ठाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी गरजू लाभाथ्यांकडून होत आहे.
——————————-
« लाभार्थ्यांनी सरपंचांना धरले होते धारेवर

महसूल विभागाच्या संजय गांधी शाखेमार्फत लाभ देण्यात येणाच्या योजनांची अर्थसहाय्य ऑक्टोबर महिन्यापासून डीबीटी प्रणालीद्दारे करण्यात येणार आहे. श्रावणबाळ, संजयगांधी निराधार, इंदिरा गांधीविधवा, दिव्यांग, वृध्दापकाळ योजनेच्या लाभाथ्यांनी ईडीबीटी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य प्राप्तकरून घेण्यासाठी आधारकार्ड व बँक पासबुक संजय गांधी विभाग तहसील कार्यालय किंवा संबंधित गावाचे तलाठी अथवा कोतवाल यांच्याकडे जमा करावे. यापूर्वी जमा केले असल्यास परत जमा करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थ्यांनी आधार सेवा केंद्राद्वारे आपले आधार अद्यावत असल्याची खात्री करावी. आधार अद्यावत नसल्यास ते अद्यावत करून घ्यावे. लाभार्थीयांना डीबीटी प्रणालीदारे अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी लाभार्थी यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. लाभार्थी यांनी बँक शाखेत जाऊन अथवा वेबसाईटवर तपासून (आधारसिडिंग) झालेले असल्याची खात्री करावी. बँक खाते आधार संलग्न नसल्यास आधारसिडींगचा फॉर्म बँकेत भरुन द्यावा.
———————–
————————————
शासन मोठमोठ्या प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु निराधार लाभार्थ्यांकडे मात्र शासनाने पाठ फिरवल्याने अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे. वरिष्ठ पातळीवरूनच अनुदान प्राप्त झाले नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!