जळगाव जामोद, .प्रतिनिधी
अमोल भगत
स्थानिक सातपुडा संस्था, जळगाव जामोद संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वा. गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, शरद पवार कृषी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भारतीय न्यायव्यवस्था व कायदे आधारित जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून न्यायाधीश मां.खारकर (दिवाणी व फौजदारी न्यायालय, जळगाव जामोद), पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार , पोलीस उपनिरीक्षक खाडे , नितनवरे , कांबळे व जेडगे तथा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार यांच्या प्रस्ताविकेने झाली. त्यांनी नवीन 3 कायद्यामध्ये झालेले बदल व नाव दुरुस्ती बद्दल सविस्तर माहिती दिली, त्यामध्ये कोणते कलम वगळण्यात आले व कोणत्या कलमा मध्ये दुरुस्ती करण्यात आली याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले. खाडे,.झेडगे व नितनवरे साहेबांनी सुद्धा कायद्याविषयी उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये खारकर यांनी महिलांसाठी कायद्यामध्ये झालेले बदल व आपल्या हक्कासाठी उपयुक्त कायदे याविषयी महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थी प्राध्यापक तथा कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा.जिव्हेश साळी यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.














