Home बुलढाणा नगरपरिषद महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या वतीने काढण्यात आली बेटी बचाव बेटी पढाओ...

नगरपरिषद महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या वतीने काढण्यात आली बेटी बचाव बेटी पढाओ अभियान रॅली

0
95

नगरपरिषद महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या वतीने काढण्यात आली बेटी बचाव बेटी पढाओ अभियान रॅली…

बेटी बचाव बेटी पढाओ अभियान रॅली

नगर परिषद महात्मा फुले कन्या शाळेचा उपक्रम

जळगाव जामोद प्रतिनिधी…

महिला व बालकल्याण विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यानुसार जळगाव जामोद शहरातील नगरपरिषद महात्मा फुले कन्या विद्यालय येथे विद्यालयाच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाओ जनजागृती रॅली काढून नंतर बेटी बचाव ची शपथ घेण्यात आली. नागरिकांमध्ये बेटी बचाव बेटी पढाओ स्त्रीभ्रूणहत्या पाप आहे याची जनजागृती होण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन दिनांक २४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भालेराव यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व व हे अभियान का सुरू करण्यात आले हे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक रावळकर, राठोड वुईके , नायसे , सुनील पद्मने , पतंगे , निलिमा डुकरे, खवणे , दंडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य व परिश्रम घेतले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!