Home बुलढाणा राज्यशास्त्र,रा. से. यो. विभाग व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार दिन...

राज्यशास्त्र,रा. से. यो. विभाग व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार दिन संपन्न

0
87

राज्यशास्त्र,रा. से. यो. विभाग व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार दिन संपन्न

जळगाव जामोद :- प्रतिनिधी

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालया अंतर्गत दिनांक 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी राज्यशास्त्र, राष्ट्रीय सेवा योजना , तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांच्याद्वारे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार शपथेचे वाचन करण्यात येऊन मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर सहकार्यक्रम अधिकारी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी मतदार शपथेचे वाचन केले तदनंतर जळगाव शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश मायी होते
कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी अर्चना जोशी कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा.गोपाल वानखडे, प्रा ऋषिकेश कांडलकर, प्रा.विनोद बावस्कर, तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!