जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
येथील तहसिल कार्यालय जवळच्या परिसरात राजीव गांधी पंचायत राज संघटन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शेतकरी चरखा संघ जळगांव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी भावपुर्ण आदरंजली वाहण्यात आली.
सर्वप्रथम गांधीवादी विचाराचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग ताडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व सुताचा हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चरखा संघाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अविनाश उमरकर यांनी उपस्थितांना चरख्याने सुत कताई करण्याचे प्रशिक्षण दिले यामध्ये शाळकरी मुलांनाही आपला मोह आवरला नाही व चरख्यावर त्यांनी सुत कातून महात्मा गांधी यांच्या कार्याचा व चरख्याने मुलांची एकाग्रता वाढते अनुभवातून समजून घेतले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चरख्याच्या माध्यमातून भारतीयांचे स्वावलंबन, रोजगार व स्वदेशी चा नारा देत संघटन करून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारला व देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. अश्याप्रकारे राष्ट्रनिर्माणाचे कार्यात चरखा केंद्रस्थानी राहिल्या मत उपस्थितांनी व्यक्त केले.
याप्रसंगी चरखा संघाचे अध्यक्ष ओ पी तायडे,अविनाश उमरकर, डॉ. वाकेकर, अंबादास बाठे, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार,ऍड भालेराव साहेब अन्सार बाबूसाहेब, रामकृष्ण धुळे,प्रवीण भोपळे,, बबलू पाटील, साबीर तळवी, भागवत राखोंडे,अशोक साबे, निलेश देशमुख, अझहर देशमुख, ऍड अमर पाचपोर, गजानन राजपूत, मनवर तळवी, गजानन मानकर,व नागरिक उपस्थित होते.














