Home बुलढाणा जनता विद्यालय म्हणजे परिसरातील लोकांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचे माध्यम –...

जनता विद्यालय म्हणजे परिसरातील लोकांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचे माध्यम – आमदार किरणराव सरनाईक

0
106

जनता विद्यालय जामोद येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार
समारंभ संपन्न.

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

जनता विद्यालय जामोद येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गतवर्षी झालेल्या शालांत परीक्षा-2024 मध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती शिक्षक विभागाचे शिक्षक आमदार किरणराव सरनाईक हे होते तर अध्यक्षस्थानी दी जळगाव एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अनिल जयस्वाल हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून एज्युकेशन सोसायटी चे सचिव अनुप पुराणिक, संस्थेचे सहसचिव मिलिंद जोशी, मुख्याध्यापक राजेंद्रसिंह राजपूत,संचालक तथा विद्यालयाचे पर्यवेक्षक अभिजित कुलकर्णी, एस. के. के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. गिरीष मायी व जनता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा अंबडकार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला संबोधित करताना किरण सरनाईक यांनी विद्यालयाबद्दल वरील गौरवोद्गार काढले. यावेळी जवळपास 27000 रू.चे पारितोषिक रोख रक्कम यास्वरुपात प्रदान करण्यात आले. सर्वात जास्त पारितोषिक कू. मयुरी सुनील रंदळे या विद्यार्थिनीने पटकावले. विषयानुसार व प्रवर्गानुसार असलेल्या वर्गिकरणानुसार पारितोषिक वितरित करण्यात आले. यामध्ये प्रथमेश धर्मे,गायत्री ढगे, रोहन धूर्डे ,रवींद्र दावर अंकिता घाटे व अन्य विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत विविध बक्षिसे पटकावली. तर इयत्ता नवव्या वर्गाचे पारितोषिक तृप्ती दामधर,रोशनी धुर्डे,प्रिया धर्मे,संजना चंगळ,चांदणी हिवराळे, प्रतीक धूर्डे, निखिल दलाल व अन्य विद्यार्थांना मिळाली.यावेळी अनुप पुराणिक, अनील जयस्वाल यांनी सुद्धा विद्यार्थांना यथोचित मार्गदर्शन केले . पाहुण्यांचे स्वागत अध्यापिका डीडोळकर यांनी स्वागत गीत गाऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्रसिंह राजपूत तर कार्यक्रमाचे संचालन व पुरस्कार वाचन ललित चांडक व घमराव घुगे यांनी तर आभारप्रदर्शन जगदीश कीर्तने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनता विद्यालय व जनता प्राथमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!