Home बुलढाणा महावितरण च्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण…

महावितरण च्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण…

0
116

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

शहरातील कुरेशी मोहल्ल्यात थकित वीज बिलाची वसुली करण्यासाठी आपल्या दोन सहकार्या सोबत गेलेल्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण झाल्याची घटना दिनांक १२ मार्च रोजी ११:३० च्या दरम्यान घडली. याविषयीची तक्रार सहाय्यक अभियंत्याने स्थानिक पोलीस स्टेशनला दिली. शहरात वास्तव्यास असलेले महावितरण जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता किशोर माणिकराव होणे यांना थकीत वीज बिलाची वसुली करीत असताना जळगाव शहरातीलच कुरेशी मोहल्यामध्ये शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.किशोर होणे हे त्यांचे सहकारी संतोष धर्मे ,प्रवीण राऊत व खलील खान बिलन खान यांच्यासोबत कुरेशी मोहल्ल्यात दिनांक १२ मार्च रोजी थकीत बिलाची वसुली करित होते. यावेळी त्यांना अनोळखी नंबर वरून सकाळी साडे अकराच्या सुमारास एका मोबाईल नंबर वरून फोन आला यावेळी समोरील इसमाने माझी लाईट गेली असल्याचे सांगितले व तुम्ही कुठे आहात मला तुम्हाला भेटायचे आहे त्या इसमास होणे यांनी कुरेशी मोहल्ल्यात असल्याचे सांगितले थोड्या वेळानंतर आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद कादर याने कुरेशी मोहल्ल्यामध्ये येऊन शिवीगाळ करत किशोर होणे यांना मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला किशोर होणे यांच्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद कादर याच्याविरुद्ध जळगाव पोस्टेला अप क्र.१३८/२०२५ कलम १३२,३२४(२),३५२,३५१(३) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक अभियंता असलेले किशोर होणे यांना मारहाण झाल्याचे समजताच महावितरण जळगाव जामोद अधिकारी चौभारेवाला यांच्यासह सम्पूर्ण महावितरण चे तंत्रज्ञ कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशन मध्ये एकच गर्दी केली होती व जोपर्यंत आरोपी वर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका घेतली होती.पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास घट्टे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!