जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
पाण्याचा अपव्यय टाळता यावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून, नेहमीच वेगवेगळे उपक्रम शासन राबवित असते. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे लहानपणी पाणी जपून वापरण्याची जाणीव करून दिल्यास त्यांना त्याची सवळ लागते.
अश्यातच सन 2016 पासून महाराष्ट्र शासनाचे वतीने 16 ते 22 मार्च “जल जागृती सप्ताह” उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात विशेष करून लहान मुलांना सहभागी करून घेतले जाते. त्यानिमित्त जलसंपदा विभाग, जिगाव प्रकल्प, शेगांव मा. नीरज कनोज व कनिष्ठ अभियंता निरंजने यांनी दिनांक 20 मार्च रोजी गुरुवारी सकाळी 10 वा. जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देत, पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, व दैनंदिन जीवन जगत असताना पाण्याचे किती महत्त्व आहे या विषयी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक यांनी सामूहिक “जल प्रतिज्ञा” घेतली.
यावेळी उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवाजी पैसोडे सह जि. प. शाळा मुख्याध्यापक काकर , ज्ञानेश्वर कारोडे , आदर्श विद्यालय चे मुख्याध्यापक नारखेडे , मानकर , नेमाडे , भुसारी, झालटे , शेगोकर , बावसकार , शुभांगी भारुडे , जूनारे इत्यादी उपस्थित होते














