Home बुलढाणा आमचे वर संस्कार आहे म्हणून समाजात काम करतो- आ. डॉ. संजय कुटे...

आमचे वर संस्कार आहे म्हणून समाजात काम करतो- आ. डॉ. संजय कुटे चिमुकल्या कन्यांनी कापली रिबीन चिमुकल्या हर्षउल्हासित

0
91

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत

अतिशय देखना आणि चांगला सोहळा सत्कार मूर्ती म्हणजे काकांनी दानशूर पणा दाखवून त्यांच्या समक्ष विस्तीर्ण व सुंदर वास्तू उभी राहिली त्यात इतरांचाही वाटा आहे त्यांना धन्यवाद देतो भूमिपूजनाला मी उपस्थित नव्हतो पण तुम्ही भूमिपूजन करून घ्या मी लोकार्पण करेल असे सांगितल्याने भूमिपूजन झाल्यानंतर आज ही वास्तू उभी झाली आपली संस्कृती हिंदू आहे त्यानुसार आमचे वर संस्कार आहे म्हणून आम्ही समाजात काम करतो असे उद्गार गोदावरी मंगल भावनांच्या लोकार्पणाच्या उद्घाटक पदावरून आ. डॉ. संजय कुटे बोलत होते गोदावरी भवन वास्तूच्या लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याला आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य गोविंदाचार्य श्रद्धाश्रम टूनकी हे होते. उद्घाटक आ. डॉ. संजय कुटे होते तर याच “गावचे लेकरू” अधी स्वीकृती समिती महाराष्ट्र राज्य व सहयोगी संपादक यदु जोशी जागा दान देणारे सुधाकरराव जोशी व त्यांच्या धर्मपत्नी सौ पुष्पाताई, नगर संघ चालक मिलिंद जोशी, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख माजी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ किशोर केला,नगराध्यक्ष रामदास बंबटकार, ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष अनिल हातेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी पुंडकर इत्यादी मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. कुटे आज पर्यंत मी इतर समाजाच्या भवनासाठी निधी दिला, मंदिरानाही सभा मंडप दिले आता या भवनांलाही आमदार निधीतून 1कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला त्यात पुंडकर साहेबाने लक्ष दिल्याने भवन सुंदर झाले त्यांना धन्यवाद देतो, आपल्या मतदार संघात साखर कारखाना उभा करून तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देऊ असे आशावादी हसत हसत मनोदय व्यक्त केला तेव्हा टाळ्याचा कडकडाट झाला त्या मुळे भाषण कधी संपले हे उपस्थिततांना कळलेच नाही यदु जोशी यांनी आपले विचार मांडताना काही लोकांन बद्दल मन भरून येते या नंतर च्या पिढीला आपण काय देणार? याचा विचार प्रत्येकाने करावा आ. डॉ. कुटे हे नेतृत्व जातीपाती पलीकडचे आहे त्यांनी त्याचे ऑदार्य सुरु ठेवावे पण राजकारणातून एक्सिट घेऊ नये.
मी गावासाठी काहीतरी भरीव कार्य करणार आहे असा मनोदय व्यक्त करून आपल्या शब्दांना विराम दिला कार्यकर्माच्या सुरवातीला दीप प्रज्वलन करून भगवान परशुराम च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री ना मा देवेंद्र फडणवीस ह्यांचा या प्रसंगी आलेला शुभेच्छा संदेश मंचच्या मागील परड्यावर दाखवण्यात आला भावनासाठी भरगोस निधी उपलब्ध करून दिल्या कारणाने ऋण निर्देश म्हणून आ. डॉ. संजय कुटे व त्याच्या पत्नी अपर्णा कुटे ह्यांचा सुद्धा सत्कार कारणात आला.
——————————————
भवनांचा दारावरील रिबीन चिमुकल्या कन्यांना आ. डॉ. कुटे व त्याच्या पत्नीने पुढे करून त्याचा हातून रिबीन कापल्याने हश्या आणि टाळ्या निनादल्या त्या वेळी उभयतांना देखील हसू आवरले नाही.
—————————————
मंचावरील सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अध्यक्ष निलेश ब्रिजमोहन शर्मा, संचलन विजय कुलकर्णी, आभार राजेश हुपेले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानणे झाल्यानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वीते साठी ब्राह्मण सभा व समाज बांधवानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!