Home बुलढाणा गौण खनिज ( गिट्टी )घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने घेतले 2 बालकांचे बळी...

गौण खनिज ( गिट्टी )घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने घेतले 2 बालकांचे बळी आजी आजोबा गंभीर जखमी , संतप्त जमावाने टिप्परला लावली आग

0
128

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

जळगाव जामोद: तालुक्यातील माऊली फाटा येथे आज सकाळी 11 च्या सुमारास भीषण अपघात घडला. पळशी सुपो येथून शेगाव कडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती-पत्नी आपल्या दोन नातवां सह मोटरसायकलने प्रवास करत होते.भेंडवळजवळील माऊली फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्र MH 28 BB 8489 या टिप्पर ने उभ्या असणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही नातवंड – पार्थ चोपडे वय 6, रा. राजापेठ, अमरावती आणि युवराज मोहन भागवत वय 5, रा. बडनेरा यांच्या डोक्यावरुन टिप्पर चे चाक गेल्या ने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त जमावाने घटनास्थळी धाव घेत टिप्परला आग लावली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलिस कर्मचारी तसेच नगर परिषद ची अग्निशमन ची गाडी घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. व या विभागाचे खामगाव येथील अपर पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनीही पाहणी करुन योग्य ते मार्गदर्शन केले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. टिप्पर चालकाचा निष्काळजी पणा मुळे 2 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला टिप्पर चालकाचा शोध घेतला जात असून दरम्यान, संतप्त जमावाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ते गौण खनिज वाहणारे टिप्पर गाडी मालक एका राजकिय पक्षाचे पदाधिकारी असल्याचे बोलल्या जात आहे.या आधी अश्या भरपूर घटना तालुक्यात घडल्या आहे अजून किती बळी घेणार अशी ओरड जनतेतून होत आहे अजून पर्यंत महसूल विभागने कुठलीच ठोस कारवाई का केली नाही हे न उलघडनारे कोडेच आहे या अशा व गौण खणिजा चा शासनाचा लाखोचा महसूल डुबत असताना महसूल प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याची चर्चा दाबक्या आवाजात सुरु आहे

त्याच् यावर नेमकी कशी कारवाई होते या कडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप नि स्नेहा शेडगे मँडम ह्या करित आहेत. आरोपी चालकास अटक :–सचिन पुंडकर रा. पिंप्री देशमुख ता. खामगांव ह्यास अटक करण्यात आली असून उद्या त्यास कोर्टात हजर केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!