Home बुलढाणा राधे कोल्ड्रिंक्सला भीषण आग… दुकान संपूर्ण जळून खाक.. आगीत अंदाजे...

राधे कोल्ड्रिंक्सला भीषण आग… दुकान संपूर्ण जळून खाक.. आगीत अंदाजे कोट्यावधीचे नुकसान

0
97

राधे कोल्ड्रिंक्सला भीषण आग…

दुकान संपूर्ण जळून खाक..

आगीत अंदाजे कोट्यावधीचे नुकसान…

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील नाव लौकिक असलेले राधेय कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानला आज दिनांक 12 मे रोजी पहाटे चार ते साडेचार च्या दरम्यान सोलर पॅनल च्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली या आगीमुळे प्रतिष्ठानचे करोडोचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. तर इतर प्रतिष्ठानलाही हानी पोहोचली आहे.याबाबत माहिती अशी की पहाटे चार साडेचार च्या दरम्यान ही आग स्थानिक नागरिकांना दिसून आली.पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या प्रतिष्ठान मध्ये आग लागल्यामुळे पोलीस स्टेशनचे ड्युुटीवरील सर्व पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी धावत आले तात्काळ जळगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले परंतु टँकर मध्ये पाणी कमी असल्यामुळे तेवढे पाणी मारून पुन्हा टँकर पाण्यासाठी गेला त्यामुळे आगीने रौर्द रूप धारण केल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी स्थानिक पोलिसांनी व नगर परिषद प्रशासनाने मलकापूर व शेगाव येथील अग्निशामक दलाला या ठिकाणी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर तिन्ही गाड्यांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळविले. पहाटेची वेळ असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच हवा आणि वादळ नसल्यामुळे इतरत्र आगीचा विस्तार झाला नाही. परंतु संपूर्ण दुकान माला सह सोलर,फर्निचर,डीप फ्रिजर या सारख्या वस्तू जळल्याने खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. हे नुकसान कोटीमध्ये असू शकते असा अंदाज साधारणता दुकानात असलेल्या संपूर्ण बनवटी नुसार व दुकानातील माल ह्यावरून काढता येतो,
नऊ वाजे दरम्यान पूर्णपणे आग विझविण्यात यश आले. तसेच आगीदरम्यान दोन-तीन वेळा सिलेंडरच्या स्फोटा चे आवाज झाले असे नागरिकांच्या चर्चेतून ऐकायला मिळाले तसेच या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानी ची शासकीय मदत मिळावी अशी चर्चा नागरिकांत सुरु होती घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आग बघण्यासाठी गर्दी जमली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!