Home बुलढाणा भारदाव टिप्पेरने दोन इसमास चिरडले

भारदाव टिप्पेरने दोन इसमास चिरडले

0
105

 

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:- 

दादूलगावात माहुली ची पुण्रवृत्ती संतप्त गावकर्यांनी लावली टिप्पर ला आग

दादुलगाव येथे दुपारच्या वेळी वडाच्या झाडाखाली बसलेल्या दोघांना एम‌.एच 28 बी.बी.2860 क्रमांक असलेल्या गौण खनीज वाहतूक करण्याऱ्या टीपरने उडवून दिल्याची घटना 22 में रोजी घडली.याबाबत सविस्तर वृत्त असे की,काशीनाथ झालटे वय 40 व समाधान काळे वय 55 दोघेही हनुमान मंदीराच्या समोर रोड लगत असलेल्या वडाच्या झाडाखाली बसलेले असतांना मानेगाव वरून भरधाव वेगाने आलेल्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वडाच्या झाडाखाली असलेल्या दोघांनाही चीरडले.यामध्ये काशीनाथ झालटे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून समाधान काळे हे सुध्दा जखमी झाले आहे.अपघाताची माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली असता गावातील संतप्त जमावाने सदर टिप्परला आग लावून पेटवून दिले.आगीत टीप्परचा पुढील भाग जळून नष्ट झाला.अपघातातील जखमिवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात येथे उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती कळताच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार श्रीकांत निचळ आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले आहे पुढील तपास पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!