Home बुलढाणा ५३ व्या बुलडाणा जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे घवघवीत यश

५३ व्या बुलडाणा जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे घवघवीत यश

0
1092

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

हिवरा आश्रम (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील विवेकानंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित ५३ वे बुलडाणा जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२५–२०२६ हे दिनांक ६ व ७ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान व बौद्धिक कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले.
या प्रदर्शनांतर्गत आयोजित स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत (Elocution Competition) स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ, जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उज्वल केले.
इयत्ता ६ वी ते ८ वी गटात आदिती हांडे (इयत्ता ६ वी) हिने प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण भाषण सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी गटात वेदिका गई (इयत्ता १० वी) हिने सुस्पष्ट विचारमांडणी व ओघवत्या शैलीत उत्कृष्ट भाषण सादर करून यश संपादन केले.
याच प्रदर्शनात झालेल्या क्विझ स्पर्धेत (इयत्ता ९ वी ते १२ वी) पार्थ चौहान याने आपली बुद्धिमत्ता व विषयज्ञान सिद्ध करत प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच मॉडेल स्पर्धेत (इयत्ता ९ वी ते १२ वी) अथर्व इंगळे याने “नवभारत स्मार्ट रेल्वे स्टेशन” या अभिनव व भविष्यवेधी संकल्पनेवर आधारित मॉडेल सादर करून परीक्षकांची विशेष प्रशंसा मिळवली.
या सर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गिरीष माळपांडे व प्राचार्य संदीप घाटे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच या यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षकांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन, कल्पकता व सातत्यपूर्ण परिश्रमांचे त्यांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे गुणवत्ता आणि नाविन्य टिकवून ठेवण्याचा संदेश दिला.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांनीही सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!