Home बुलढाणा जुगार अड्डयावर सलग चौथी मोठी कारवाई

जुगार अड्डयावर सलग चौथी मोठी कारवाई

0
209

धानोरा महासिद्ध व जळगाव जामोद येथे जुगार अड्डयावर वेगवेगळी कारवाई

जुगार अड्डयावर सलग चौथी मोठी कारवाई

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्या फिर्यादीवरून धानोरा येथे सुधाकर खूपसे पाटील यांच्या शेतामध्ये सुरू असलेल्या पत्त्याच्या खेळावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत मुद्देमालासह आरोपींना अटक केली तसेच जळगाव जामोद येथील पीएम मॉल च्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या पत्त्याच्या खेळावर सुद्धा धाड टाकून मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दोन्ही मिळून मुद्देमालसह आरोपी पोलीस स्टेशन ला आणले यात धानोरा महासिद्ध येथे मुद्देमाला सह पकडण्यात आलेल्या १,२८,२२० रुपये किंमत आहे तर जळगाव जामोद येथील कारवाई मध्ये एकूण १,०६,०७० असा एकूण २,३४,२९० एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पीएसआय नागेश खाडे व कॉन्स्टेबल प्रफुल डबे या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रुचून ही कारवाई करण्यात आली.

यावेळेस अमोल पंडित पोलीस उपनिरीक्षक पोलीस शेख आयुब,कॉन्स्टेबल प्रफुल डबे, शेख इरफान, समाधान शिंगणे, सचिन शेळके. शांताराम धीरबक्षी,गजानन सातव .पो का अर्जुन सोरमारे, राहुल सोनोने, अनिकेत येवले, पवन साखरे. ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस कारवाई करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!