स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक सप्ताह निमित्त एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक सप्ताहा निमित्त दि. १६ जानेवारी २०२६ रोजी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वयं आरोग्याविषयी माहिती, आत्मसंरक्षण प्रशिक्षण तसेच फुलांपासून रांगोळी व फुलांचे गुच्छ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश माई हे होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिनानिमित्त एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वयं आरोग्याविषयी माहिती, आत्मसंरक्षण प्रशिक्षण तसेच फुलांपासून रांगोळी व फुलांचे गुच्छ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश माई हे होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश माई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा युवकांच्या जीवनावर होणारा सकारात्मक प्रभाव स्पष्ट करत, शारीरिक, मानसिक व सामाजिक सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसऱ्या सत्रात. डॉ. आशा निकते यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता, आहार व मानसिक आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली.
तिसऱ्या सत्रात वर्षा पराग चिंचोळकर, शिवाजी चव्हाण, तन्मय पवार व वंदना हेमंत पिंपळखरे यांनी विद्यार्थिनींना स्वयं संरक्षणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली.
चौथ्या सत्रात मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट अंतर्गत मुलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी वर्षा पराग चिंचोळकर व वंदना हेमंत पिंपळखरे यांनी विद्यार्थ्यांना फुलांपासून आकर्षक रांगोळी व फुलांचे गुच्छ तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कौशल्य विकासाचा अनुभव घेतला.
या प्रशिक्षण कार्यशाळेत १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामेश्वर सायखेडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. उमरकर यांनी मानले.
सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा.अर्चना जोशी ,प्रा. डॉ. प्रवीण डाबरे यांच्यासह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. डॉ गिरीश माई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा युवकांच्या जीवनावर होणारा सकारात्मक प्रभाव स्पष्ट करत, शारीरिक, मानसिक व सामाजिक सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसऱ्या सत्रात स्त्री रोग तज्ञ डॉ. आशा निकते यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता, आहार व मानसिक आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली.
तिसऱ्या सत्रात वर्षा पराग चिंचोळकर, शिवाजी चव्हाण, तन्मय पवार व वंदना हेमंत पिंपळखरे यांनी विद्यार्थिनींना स्वयं संरक्षणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली.
चौथ्या सत्रात मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी वर्षा पराग चिंचोळकर व वंदना हेमंत पिंपळखरे यांनी विद्यार्थ्यांना फुलांपासून आकर्षक रांगोळी व फुलांचे गुच्छ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कौशल्य विकासाचा अनुभव घेतला.
या प्रशिक्षण कार्यशाळेत १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामेश्वर सायखेडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. उमरकर यांनी मानले.
सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अर्चना जोशी, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण डाबरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे परिवेक्षक प्रा.वानखेडे, प्रा. देवकर प्राध्यापक कांडलकर, प्रा. जोशी, प्रा. सचिन उनडकाट, प्रा भोपळे, प्रा.धर्माळ, अधीक्षक संजय गाडेकर, अभिजीत माटे, अश्विन गिरजापुरे, योगेश तायडे, हर्षद धर्मे, गजानन वानखडे, समाधान निलजे, बाबुराव चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले.
कार्यशाळेत प्रात्यक्षिक सादर करतांना विद्यार्थी व मंच वर उपस्थित मान्यवर.














