Home बुलढाणा नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

0
236

पिंपळगाव काळे येथे नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने १७ जानेवारी रोजी पिंपळगाव काळे येथे जळगाव जामोद नगरपरिषद निवडणुकीत नवनियुक्त निवडून आलेल्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
​कार्यक्रमात खालील नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
१. सय्यद नफीज (जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी)
२. इरफान खान (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
३. सिद्धार्थ हेलोडे (नगरसेवक)
४. वाहिदा अंजुम अब्दुल जहीर (नगरसेवक, एमआयएम) अब्दुल जहीर यांचा तर
५. शेख गुलाब (नगरसेवक, एमआयएम)
६. डॉ. सलीम साहेब (नगरसेवक, अपक्ष)
७. ॲड. करीम खान (स्वीकृत नगरसेवक )

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील होते. मंचावर विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव, एमआयएम शहराध्यक्ष समीर आर्यन,समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष मुस्ताक जमदार, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, खरेदी विक्री संघाचे संचालक एकनाथराव ताठे आणि रशीद आदी मान्यवर उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी त्यांनी आघाडीच्या विजयाचे महत्त्व सांगून आगामी ध्येयधोरणे स्पष्ट केली. त्यानंतर नवनियुक्त नगरसेवक ॲड. करीन खान, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज भाई, एमआयएम शहराध्यक्ष समीर आर्यन, नगरसेवक जहीर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रफिक यांनी आपली मनोगते व्यक्त करत मतदारांचे आभार मानले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील म्हणाले की, “हा विजय केवळ उमेदवारांचा नसून सर्वसामान्य जनतेचा आणि शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जनहिताची कामे करण्यासाठी नेहमी तत्पर राहावे.

“​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सपकाळ यांनी आपल्या खास शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार फिरोज यांनी मानले. या प्रसंगी पिंपळगाव काळे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!