Home बुलढाणा इंग्रजी खूप सोप्प आहे

इंग्रजी खूप सोप्प आहे

0
73

इंग्रजी खूप सोप्प आहे :डॉ संदीप डवंगे
—————————————————————–

नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे :-

 

“मास्टर की” इंग्रजी खूप सोप्प आहे

या पुस्तकाचे लेखक बालरोग तज्ञ तथा संमोहन तज्ञ एन एल पी कोच डॉ संदीप डवंगे यांनी श्रीमती तुलसी देवी रंगलालजी झांबड महाविद्यालयाच्या ग्राम अलमपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांना मूलभूत इंग्रजी विषयी सखोल मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की
ग्रामीण विभागातील विद्यार्थी इंग्रजीच्या कौशल्यांच्या अभावी शहरांतील रोजगारापासून वंचित राहतात.

 

इंग्रजीच्या मूलभूत गोष्टी मुलांना जुजबी फक्त नावापुरत्याच माहिती असल्यासारख्या माहिती असतात.त्याचे वेगवेगळे उपयोग,वेगवेगळ्या जागा ह्या त्यांना माहिती नसल्यामुळे त्याविषयी त्यांच्या मनात भीती, गोंधळ व संभ्रम निर्माण झालेला असतो.तो गोंधळ व ती भीती दूर करण्याकरिता उपरोक्त लेखकांनी विद्यार्थ्यांना मूलभूत इंग्रजी विषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

 

 

त्यात त्यांनी कुठल्याही संवादात फक्त दोनच गोष्टी असतात एक – कुणाविषयी वा कशाविषयी काहीतरी माहिती सांगितल्या जात असते जसे तो काय आहे? तो कसा आहे? तो कुठे आहे? या प्रकारात कुठलीही क्रिया होत नसते तर दुसऱ्या प्रकारात काहीतरी क्रिया घडत असते व त्या प्रकारात त्या क्रियेविषयीच बोलल्या जात असते की ती क्रिया काय आहे? कशी आहे? कुठे घडली? केव्हा घडली? का घडली? अशा प्रकारचीच माहिती त्या ॲक्शन व्हर्बच्या प्रकारांमध्ये सांगितल्या जात असते. या दोन प्रकारांशिवाय कुठल्याही भाषेत संवाद असूच शकत नाही.म्हणून इंग्रजीत या दोन्ही प्रकारातील मूलभूत फरक काय असतो हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले.

 

 

या दोन्हीही प्रकारात ॲम,इज, आर व वॉज,वेअर हेच सहाय्यकारी क्रियापदे वापरल्या जात असतात.पहिल्या प्रकारात ते फक्त एकटेच असतात त्यांना लिंकिंग व्हर्बस असे म्हणतात.तर दुसऱ्या प्रकारात ते मेन व्हर्ब सोबत येऊन क्रिया कोणत्या काळातील आहे हे सांगण्यास मदत करीत म्हणून त्यांना हेल्पिंग व्हर्ब असे म्हणतात.

 

 

अशाप्रकारे इंग्रजी भाषेतील या मूलभूत गोष्टींच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या सर्व भीती व शंका दूर झाल्या व आत्मविश्वास दुणावला.सोबतच संमोहनाची प्रात्यक्षिके दाखविली.ज्यात सुद्धा टुचत नाही,डोक्यातून नंबर डिलीट केल्या गेला,नाव विसरून दुसरे सांगितलेले नाव सांगितले ,सूचनेमुळे संमोहन तज्ञ समोर उभे असताना सुद्धा दिसत नाही,आवाजही येत नाही,समोरच्या मुलीला कॅटरिना कैफ म्हणून ऑटोग्राफ मागितल्या जातो.

 

 

अशा प्रकारची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना संमोहनाच्या माध्यमातून करून दाखवली व मनाची कार्यपद्धती कशी असते ते सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजवून सांगितले.अशाप्रकारे बुद्धीवर्धक,ज्ञानवर्धक व मनोरंजक अश्या दीड तासाच्या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी भरघोस आनंद लुटून कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

 

 

प्राचार्यांनी व विद्यार्थ्यांनी डॉ संदीप डवंगे यांना पुढील प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मनोज जैन सर,तसेच कोठारी विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री श्यामकांत काळवीट सर उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!