Home बुलढाणा अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न

0
199

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न
वृध्दावर गुन्हा

नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे :

भोलजी येथील रहिवासी असलेल्या एका ६० वर्षीय वृध्दाने आपल्या नातवाच्या वयाच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अश्लील चाळे करत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला.औरंगपूर ता. नांदुरा येथील रहिवासी असलेला १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजेदरम्यान वडनेर भोलजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बसलेला होता.

 

 

त्यावेळी आरोपी सुनील सातव वय ६० वर्षे रा. वडनेर भोलजी याने पीडित मुलाला गाठले व पीडित मुलाचे दोन्ही हात स्वतःच्या मांडीवर ठेवले. त्याच्या पूर्ण अंगावरुन हात फिरवून अत्यंत लज्जास्पद आणि गैरकृत्य केले.

 

 

 

घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच वडनेर भोलजी पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार अजय सुरडकर यांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलीसांत आरोपी सुनील सातवविरुध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.

 

 

 

६० वर्षीय व्यक्तीने नातवाच्या वयाच्या मुलासोबत केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे समाजात नैतिक अधःपतनावर चर्चा सुरु झाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!