संगीतमय शिवपुराण कथेला प्रारंभ
नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे :
शहरातील पेठकर गल्ली येथे औदुंबर महादेव संस्थान सोहळ्यानिमित्त ९ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत संगीतमय शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
खंडोबा भवानी मंदिर वसाडी येथील हभप प्रेम मुर्ती बळीराम महाराज ढोले यांच्या वाणीतून सायंकाळी ७ ते १० या वेळेत शिवपुराण कथा सादर केली जाणार आहे.
कथेच्या समारोपीय दिनी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. महाप्रसादानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कथेच्या प्रारंभी भाजपा नेते सुधिर मुर्हेकर, नगरसेवक अनिल जांगळे,नगरसेवक राहुल गोठी, नगर सेवक रामसिंह ठाकुर, प्रमोद खोंड,अमोल डहाके, शुभम ढवळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन हभप बळिरामजी महाराज ढोले यांचे पतन करून त्यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
भावीकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.














