जेसीबीची मोटारसायकलला धडक १ गंभीर
नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे :
तालुक्यातील वडनेर भोलजी येथे जेसीबी चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल स्वार त्यात गंभीर जखमी झाल्याची घटना २८१ जानेवारी रोजी घडली.
त्याबाबतचा गुन्हा ११ फेब्रुवारी रोजी दाखल झाला आहे.याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार २८ जानेवारी रोजी शेषराव नामदेवराव सोनवणे रा. मलकापूर हे त्यांचे मोटार सायकल क्र. एम एच २८ बी एच २५४५ ने मलकापूर वरुन लांजुळ येथे नांदुरा रोडने जात असतांना जेसीबी क्रमांक एमपी०९ जी एफ ४९७२ च्या चालकाने जेसीबी भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून शेषराव सोनूने यांना जोरदार धडक दिली.
त्यामुळे त्यांचे डोक्याला पाठीमागे व डाव्या पायाच्या गुडघ्यावरील भाग व डाव्या पायाला दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर त्यांची पत्नी व त्याचा पुतण्या सहदेव गणपत सोनुने याला माहिती दिली. फिर्यादी यांचे डोक्याला मार असल्याने प्रथम त्यांना वत्सल हॉस्पिटल (डॉ भागवत) गौरक्षण रोड, अकोला येथे भरती केले.
३० जानेवारी पासून पायाला इजा असल्याने डॉ. सोनवणे अकोला यांचेकडे त्यांचा इलाज सुरु आहे. फिर्यादी यांचा सोनवणे हॉस्पिटल अकोला येथे नोंदविलेल्या जबाबा वरुन अप सदरचा दाखल करण्यात आला.














