Home बुलढाणा बावनबिर शिवरात गव्हाला आग लागून ठिंबक नळी खाक

बावनबिर शिवरात गव्हाला आग लागून ठिंबक नळी खाक

0
156

 

 

 

 

 

बावनबिर प्रतिनिधी अशोक आकोटकार :-
बावनबिर शिवरात गव्हाला आग लागून ठिंबक नळी खाक
बावनबीर येथील शेत शिवरात भर दुपारी अचानक कापणी झालेल्या गव्हाला आग लागून त्यातील तीन एकर मधील ठिंबक नळीला आग लागून खाक .शेती उपयोगी साहित्य सही जळून नष्ट झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे नुकसान दीड ते दोन लाखापर्यंत झाले आहे .सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नाही .स्थानिक दिलेल्या माहितीनुसार बावनबीर येथील सदनशील शेतकरी सौ भाग्यलता अनिल आकोटकार यांच्या मालकीच्या बावनबीर येथील गट क्रमांक 185 मधील सुमारे तीन एकर क्षेत्रातील कापणी झालेल्या गव्हाला अचानक आग लागली आणि शेजारील शेतकऱ्यांनी यांची माहिती तत्काळ आकोटकार यांना दिली. माहिती मिळताच त्या शेतामध्ये गावकऱ्यांनी धाव घेतली. शेतात पोचल्यास संपूर्ण ठिंबक नळी पेट घेऊन रौंदरुप धारण केले होते. आग एवढी पसरत होती की, विजवण्यासाठी स्थानिकांनी केलेले सर्व प्रयत्न निष्पर ठरले. सायंकाळ पर्यंत करूनही आगीवर नियंत्रण ठेवता आले नाही. परिणामी जळून सगळे खाक झाले. या आगीत स्प्रिंगलर , ठिंबक सिंचन तसेच पाईप व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. आधीच कर्जाच्या ओझ्या खाली दबलेल्या शेतकरी महिला सौ भाग्यलता अनिल आकोटकार यांच्याकडे अपंग सर्टिफिकेट असून दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .ही आग कशामुळे लागली हे समजले नसून संबंधित प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी महिला कडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!