Home बुलढाणा नांदुरा नगर परिषद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नांदुरा नगर परिषद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0
38

नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे : आज 14 एप्रिल रोजी नांदुरा नगर परिषद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर मिलिंद नगर नांदुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर बुलढाणा रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई सुधीर मुऱ्हेकर, उपाध्यक्षा सौ.माधुरीताई प्रमोद खोंड,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.मिलिंदजी दारोकार,नगरसेवक सुधिरभाऊ मुऱ्हेकर,नगरसेवक अनिल जांगळे, नगरसेवक रामसिंग ठाकूर,नगरसेवक उमेश इंगळे, नगरसेवक जुबेर खान, नगरसेवक राहुल गोठी,प्रमोद खोंड,प्रमोद हिवाळे, सुनिल तांदळे, नगरसेवक विनायक बोडखे, नगरसेवक रोशन पांडव,अमोल डहाके,दिनेश राऊत, शुभम ढवळे,नगरपरिषदेचे कर अधिक्षक गणेश मुळे, सुनील वाकोडे, निलेश सोनवणे, अक्षय जाधव, अविनाश मानकर तसेच नगरपरिषदेचे नगरसेवक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!