Home बुलढाणा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यामध्ये ग्रामपंचायत पळशी झाशी प्रथम क्रमाकांचे मानकरी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यामध्ये ग्रामपंचायत पळशी झाशी प्रथम क्रमाकांचे मानकरी

0
14

 

प्रतिनिधी बावनबीर (अशोक आकोटकार)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत संग्रामपूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत पळशी झाशी यांनी दमदार कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे मानकरी.

   शासनाचे सुरू असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यामध्ये ग्रामपंचायत पळशी झाशी यांनी सुरुवात पासूनच भाग घेऊन आज रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये तालुक्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला,

    ग्रामपंचायत पळशी झाशी हे गाव सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासूनच एक कॉल प्रॉब्लेम सॉल या ब्रीद वाक्यातून सुरू केलेले विकास कामे, तसेच नवनवीन उपक्रम, गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, याविषयी केलेल्या उपाययोजना, ग्रामपंचायत भवन मधील सर्व ऑनलाईन कामे, शाळेमध्ये केलेली विविध विकास कामे, अंगणवाडीमध्ये चिमुकल्यांसाठी केलेले नवनवीन उपक्रम, लोकसहभागातून केलेली विकास कामे,तसेच विविध विकास कामे, व्यायाम शाळेसाठी चांगल्या व्यवस्था, गावातील वाचनालयासाठी वेळोवेळी लक्ष देऊन पुस्तके देऊन तसेच लागणाऱ्या अडचणी नेहमीच दूर करण्यात आल्या, जनावरांसाठी पाण्याचे हौद, गावात सर्व धर्म समभाव मिळून केलेली सर्व कामे, ग्रामपंचायत भवन, शाळा, अंगणवाडी, बुद्ध विहार, व्यायाम शाळा, या सर्वांची केलेली रंगरंगोटी तसेच सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. या सर्व गोष्टींच्या आधारावर आज ग्रामपंचायत ने आपले नाव कोरले आहे.

यापूर्वी सुद्धा सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांनी आपल्या कर्तबदारीच्या भरोशावर नाशिक येथे गुरुमाऊली तसेच न्याय मंत्री श्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार, जिल्हास्तरीय सरपंच लोकमत अवार्ड बुलढाणा, लोणावळा पुणे येथे अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्यामार्फत राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार, पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर येथे राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार, अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार, नागपूर येथे सकाळ गौरवगाथेच्या मानकरी, तसेच पंचायत समिती संग्रामपूर, व गावकरी मंडळी यांच्या हस्ते 50 ठिकाणी शाल श्रीफळ साडी देऊन सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना गौरवण्यात आले हे विशेष…

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत

श्री शंकरजी महाराजांच्या आशीर्वादाने

ग्रामपंचायत पळशी (झाशी) यांनी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून 15 लाख रुपये बक्षीसाचे मानकरी ठरून गावाचे नाव उज्ज्वल केले.

 

या यशामागे प्रत्येक क्षणाला साथ देणारे तहसीलदार मा .प्रशांत पाटील साहेब, गटविकास अधिकारी मा.माधवजी पायघन, सचिव हेमंत देशमुख, सर्व ग्रामस्थ, मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, , तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, माजी सैनिक ,कर्मचारी, कृषी सहाय्यक,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गट महिला,व सहकारी सर्व मित्र मंडळ, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व मान्यवर वेळोवेळी प्रसिद्धी देणारे पत्रकार बांधव यांचे मनःपूर्वक आभार.

 

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले.

असेच प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य कायम राहू द्या… ✨

 

— सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे 🌸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!