Home बुलढाणा चिमुकली सोबत लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मूसक्या .

चिमुकली सोबत लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मूसक्या .

0
128

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी अप क्र 624/2023 कलम 376,376 अ. ब. भादवी सह कलम 4.8.12 पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पिडीता ही सहा वर्षाची अल्पवयीन ही घरातून बाहेर खेळण्याकरीता गेली असता आरोपीने तिला आमीष दाखवून तिला घरी नेउन तिचेशी जबरी संभोग केला व तिला चॉकलेट साठी 5 रू. देउन कोणाला सांगू नको नाहीतर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली..सदर गुन्हयातील आरोपी विठ्ठल समाधान दामोधर राहणार खर्डा खुर्द हा तक्रारदार गावातुन पोलीस स्टेशनकडे जात असतानाचं गावातुन फरार झाला होता. सपोनी पी आर इंगळे यांनी सदर आजूबाजूच्या परीसरात व गावोगावी आरोपीच्या शोध घेतला असता तो मिळुन येत नव्हता.गोपणीय माहीती मिळाल्यावरुन सदर आरोपी हा अकोला येथील वसंत देसाई स्टेडियम येथे असल्याचे समजले.यावरून सपोनि इंगळे यांनी स्थानिक पोलीसांची मदत घेऊन शोधमोहीम सुरू केली. व जळगाव जामोद येथून पोलीस स्टाप रवाना केला. आरोपी हा मोबाईल चालू बंद करीत होता. व वेळोवेळी लोकेशन बदल करीत होता. पोलीसांनी अकोल्या मधील परीसर पिंजून काढला. परंतू आरोपी हा मुंबई कडे रवाना झाल्याचे समजले. मुंबई ला पोलीस उपनिरिक्षक नारायण सरकटे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार ,पोकॉ सागर तांदळे यांना रवाना करून आरोपीचा मुंबई कडील नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. आरोपी हा नातेवाईक कडे गेला खरा परंतु सदर ठिकाणी जास्त वेळ थांबला नाही त्यामूळे आरोपी मिळून आला नाही. आरोपी ने मुंबई वरून पुणे गाठले. पुणेवरून भुसावलकडे येत असतांना त्याने रेल्वेमधिल प्रवाशांच्या मोबाईल वरून एका नातेवाईक ला कॉल केला.त्या सिडिआर व एसडिआर वरून माहिती घेऊन सपोनी इंगळे ,नापोका ईरफान शेख व पोका प्रेमसिंग पवार यांनी भूसावल रेल्वे स्टेशनवर सापळा रचून आरोपी ताब्यात घेतला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कळसणे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात ,उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळि ,पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे,पोलीस निरीक्षक बेहरानी ठाणेदार नांदुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार, नापोकॉ इरफान शेख , पोकॉ सचिन राजपुत ,पोकॉ सागर तांदळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंंग पवार, प्रफुल्ल डब्बे यांनी केली.आरोपीला न्यायालयाने दिनांक 28 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पीएसआय रंजना आवारे व पोलीस कॉन्स्टेबल रंजित व्यवहारे करीत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!