Home बुलढाणा काँग्रेस ने खांद्यावर मिरवलेला सरपंच राष्ट्रवादीत ! “दोस्त दोस्त ना रहा”

काँग्रेस ने खांद्यावर मिरवलेला सरपंच राष्ट्रवादीत ! “दोस्त दोस्त ना रहा”

0
134

काँग्रेस ने खांद्यावर मिरवलेला सरपंच राष्ट्रवादीत !
“दोस्त दोस्त ना रहा”

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

ज्यांनेत्यांना त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आपल्या खांद्यावर उचलतात, त्या हर्षवर्धन सपकाळ यांनी एका व्यक्तीला आपल्या खांद्यावर उचलले होते. अर्थातच ही कुणी साधारण व्यक्ती नाही.. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत गावातून निवडून आलेले गोमाळ गावंचे सरपंच राजु मुजलदा आहेत.. जे सपकाळ यांचे जीवश्च आणि कंठश्च मित्र म्हणून ओळखल्या जातात.. पण या जिगरी मित्राने हर्षवर्धन सपकाळांच्या तसेच काँग्रेस चा विश्वासाचा घात केलेला दिसत आहे. आजच जुमानसिंग म्हणजे राजु मुजलदाने प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सपकाळांच्या खांद्यावर बसलेल्या राजुने ‘हात’ सोडत प्रसेनजीत पाटलांचे बोट पकडून हातावर ‘घडी’ बांधून घेतली. राजुची ही कृती सपकाळांचे ‘दिल तोडने’ वाली ठरली.. ‘तो असा करूच शकत नाही.. काहीतरी गैरसमज झाला असावा’, अशी प्रतिक्रिया सपकाळांची आहे. पण वास्तव हेच की, ‘दोस्त दोस्त ना रहा..’. समाधान एव्हढेच असेल की, राजु मुजलदा विरोधी पक्षात न जाता महाविकास आघाडीच्या घटकपक्षातच शिरले आहेत.

दहा दिवसापूर्वी माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी बुलढाण्याचा आदिवासी बहुल भाग असणार्‍या जळगांव जामोद तालुक्यातील कुंवरदेव येथे साजरी केली. कुवरदेवचे सरपंच जुमानसिंग (राजू ) भुवनसिंग मुजलदा हे जनतेतून सरपंच पदी निवडून आले. त्यांचा सत्कार हर्षवर्धन सपकाळ यांनी करत त्यांना खांद्यावर घेत त्यांची गावभर मिरवणूक काढली होती. ते हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा कार्यकम झाला. काही दिवसाआधी जळगाव जामोद तालुक्यातील कुवरदेव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जुमानसिंग भुवनसिंग मुजलदा हे थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांच्यासह भारत भावसिंग चव्हाण, कालु बामन्या, दिलीप मुजलदा, अर्जुन भुरा, डूडवा गोमाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!