Home बुलढाणा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची खा. नवनीत राणा यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची खा. नवनीत राणा यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.

0
130

 

खामगांव (प्रतिनिधी) :- खामगांव ते अमरावती मेमो रेल्वे सुरु करण्यात यावे अशी मागणी दि. २२ नोव्हेंबर २०२३ ला अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना ने खासदार नवनीत कौर राणा यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन देऊन असे सांगितले की . विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाचे सर्वात मोठे शहर तसेच सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई – कोलकत्ता मध्य रेल्वे लोहमार्गाच्या भुसावळ रेल्वे विभागामध्ये येणाऱ्या जलंब या लहानशा रेल्वे स्टेशन पर्यंत खामगांव येथून तीन डब्यांची रेल्वे सुरु आहे. खामगांव हे शहर अमरावती महसूल विभागात येत असून शैक्षणिक व इतर महत्वाच्या कार्यालयात कामासाठी खामगांव परिसरातील नागरिकांना खामगांव ते अमरावती ये – जा करण्याकरिता बस किंवा खासगी वाहनाशिवाय दुसरा पर्याय नाही. असे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेने खा. नवनीत कौर राणा यांना निवेदनाद्वारे सांगितले.

निवेदन देतेवेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटने चे राष्ट्रीय अध्यक्षा माधुरीताई शर्मा, विदर्भ उपाध्यक्ष मनीषाताई टाकसाळ, महाराष्ट्र उपाध्यक्षा लीनाताई पाचबोले, सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर,रुपालीताई वानखडे,फुलाबाई राठोड, रजनीताई चव्हाण, नलिनीताई राऊत, कु. कुसुमताई चौहान , जेष्ठ पत्रकार राजकुमार व्यास, युराज चौहान, विनय चौहान, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!