Home बुलढाणा जागतिक संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

0
98

 

शेगांव (प्रतिनिधी) :- दि. २६ नोव्हेंबर २०२३ ला प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक संविधान दिन व गुणवंत महिलांचा सत्कार आयोजक अलकाताई बांगर यांच्या हस्ते शेगांव येथे करण्यात आला.

संविधान दिवसाबद्दल महिलांचे हक्क अधिनियम अधिकार यांच्या विषयी माहिती दिली आणि हिंदू कोड बिल जे आपण सरकारी मुद्द्यावर महिलावर्ग ज्यांना प्रसूतीची सहा महिने व सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस, जर आज सती प्रथा अस्तित्वात असती तर समाजातील स्त्री ही नक्कीच चूल आणि मूल यातच अडकून असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल काढले नसते तर स्त्रियांच्या पायातील बेडी ही तशीच अखंड राहिली असती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला त्यांच्या जीवनाचा अधिकार त्यांचा सन्मान व समानतेचा हक्क दिला आज भारतीय संविधान हे जगातील एकमेव संविधान आहे की जिथे स्त्री पुरुष समानता आहे. प्रत्येक स्त्रीचा आत्मसन्मान म्हणजे भारतीय संविधान आहे. अशा प्रकारे वृक्षारोपण करून संविधान दिवस साजरा करण्यात आला. व समाजातील उत्कृष्ट व होतकरू महिला यांचा संविधान देऊन सन्मानित करण्यात आले.

सन्मान व सत्कारमूर्ती
१) शीतलताई शेगोकार -शेगांव, २) मंगलाताई सोळंके -शेगांव , ३मैफुजाताई सय्यद – डोणगांव, ४) जयश्रीताई बोराळे – बुलढाणा , ५) ज्योतीताई बावस्कर -खामगांव , ६) रंजनाताई राठोड -खामगांव , ७) जयश्रीताई देशमुख -खामगांव , ८) प्रनिताताई धामंदे -शेगांव , ९) लीलाताई वेरूळकर -पातुर्डा, १०) मा. नगर सेविका मलाताई ठवे -शेगांव , ११) वैशालीताई तायडे-खामगांव , इत्यादी महिलांना संविधान देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी महाराष्ट्र महिला अध्यक्ष शितलताई शेगोकार तसेच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ वैशालीताई तायडे, मंगलाताई सोळंके, दीपमालाताई कांबळे, राजकन्याताई रेवसकर, जयश्रीताई बोराडे, ज्योतीताई बावस्कर, जयश्रीताई देशमुख, प्रणिताताई धामंदे, मैफुजा ताई , अकोला जिल्हा अध्यक्ष पूजाताई खेते, सय्यद इत्यादी महिलांचा सन्मान सत्कार प्रगती महिला क्रीडा बहुउद्देशीय संस्था द्वारे करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित महिला नर्मदाताई इंगळे, दीपमालाताई, गंगाताई गायकवाड, सुजाताताई व इतर महिलांची उपस्थिती होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बांगर यांनी केली त्यांनी महिलांच्या हक्काविषयी हिंदू कोड बिल विषयी आणि स्त्री पुरुष समानता याविषयी महिलांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!