Home बुलढाणा सहकारमध्ये शैक्षणिक समस्यांवर चर्चा

सहकारमध्ये शैक्षणिक समस्यांवर चर्चा

0
123

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी १२ जानेवारी रोजी जळगांव जामोद विभागातील सहकार विद्यामंदिरच्या शाळांना सदिच्छा भेट दिली.

शाळा स्तरावरील विविध शैक्षिणिक समस्या तथा शिक्षणाच्या दर्जाबाबत चर्चा करण्यात आली. बुलडाणा अर्बन चरीटेबल सोसायटीद्वारा संचालीत केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद, वरवट बकाल आणि दानापूर या शाळातील शिक्षणाच्या गुणात्मक वाढीसाठी भाईजीनी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला.

यासोबत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचे महत्व आणि बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी ग्रंथालयाची रचना या संदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला, सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ. स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे, पर्यवेक्षिका अर्चना कुलकर्णी, विनोद ईश्वरे, दिनेश येउल, योगेश घुटे, गजानन खरात, बुलढाणा अर्बनचे बँक व्यवस्थापक संतोष केला, राजेश राठी यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!