पद्मावती नदीच्या खोलीकरण व संरक्षण भीतीचे काम लवकर सुरू करण्यासाठी ठिय्या आंदोलन
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
मागच्या वर्षी 22 जुलै रोजी ढगफुटी ने आलेल्या महापुरात पद्मावती नदी काठच्या शेकडो लोकांची घरे महापुराने वाहून गेली तर काहींच्या घराची पडझड झाली कित्येकांचे संसार उघड्यावर आले त्यामुळे पद्मावती नदीचे खोलीकरण करणे आवश्यक आहे
तसेच पूर संरक्षण साठी भिंत बांधणे व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नदीकाठाच्या रहिवाशांची आहे यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
निवेदनामध्ये नमूद आहे की मागच्या वर्षी आलेल्या महापुराने शेकडो लोकांचे घरे,दुकाने, पुरात वाहून गेली त्यांना अद्यापही कुठलीच मदत मिळालेली नाही ज्याची गुरेढोरे वाहून गेली त्यांना सुध्दा मदत मिळाली नाही
तसेच कसलेही सहकार्य नगर परिषद प्रशासनाकडून केल्या जात नाही ह्या वर्षी नुकताच पावसाळा सुरू झाला आहे नदीकाठच्या रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संपूर्ण पद्मावती नदीचे खोलीकरण करणे आवश्यक आहे पूर संरक्षण भिंती ची ही आवश्यकता नदीपात्रातील आणि शहरातील नाल्या ,गटारा मध्ये कचरा घाण साचलेला आहे तो सुध्दा साफ करणे आवश्यक आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन नगर परिषद मुख्याधिकारी, नगर अभियंता, आणि संपूर्ण नगर परिषद प्रशासन व प्रशासक यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे
नगर परिषद प्रशासन हे अजून किती मोठ्या महाप्रलयाची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न येथील नागरिक विचारात आहे तरी ही कामे युध्द पातळीवर पूर्ण करण्याची गरज आहे अशी मागणी निवेदनात केलेली आहे
निवेदनावर अब्दुल जहीर,अशपाक देशमुख,शिवराम ताडे, शालीग्राम वानखडे, नारायण वंडाळे संतोष धुर्डे, शेख इम्रान, निसार खान, समाधान वानखडे अशोक नोवारकर,जानकाबाई नोवारकार, राजू सुपलकर यांच्या सह बऱ्याच नागरिकांच्या, सह्या आहे तसेच महिला वर्ग सुधा यावेळी उपस्थित होत्या
नगर परिषद ने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ह्या पेक्षा ही तीव्र आंदोलन करणार असा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे














