Home बुलढाणा राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन

0
99

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन

जळगाव जामोद:- प्रतिनिधी

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील जहालवादी नेतृत्व नेताजी सुभाष चंद्र बोस यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले
अभिवादन कार्यक्रम प्रसंगी विश्वरूप नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक विजयराव कुळकर्णी तसेच दि न्यू ईरा स्कूलचे माजी पर्यवेक्षक सेवानिवृत्त शिक्षक वसंत पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
तदनंतर विजयराव कुलकर्णी यांनी नेताजींच्या जीवनावर प्रकाश टाकत नेताजींच्या प्रत्येक भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ करणाऱ्या “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा ” या घोषणेची आठवण करून दिली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे औचित्य तसेच उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली
कार्यक्रमाला महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!