Home बुलढाणा पालकमंत्र्यांच्याहस्ते जळगांव जामोद येथील ठाणेदार निचळ यांचा गौरव

पालकमंत्र्यांच्याहस्ते जळगांव जामोद येथील ठाणेदार निचळ यांचा गौरव

0
82

जळगाव जामोद प्रतिनिधी
स्थानिक
पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांचा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी बुलढाण्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.जिल्ह्यातील विधानसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ग्राम भिंगारा येथील गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ४५०५ किलो गांजा अमली पदार्थ ज्याची किंमत अंदाजे ४ कोटी ५१ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीत जेलबंद केले होते. पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अप नंबर ६२७/२०२४ कलम २० NPDS Act प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. या
कारवाईदरम्यान ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या पथकाला अक्षरशः एक ते दीड एकर शेतामधील सहा ते सात फूट उंच असलेल्या गांजाच्या झाडांना उपटून त्यांच्या पेंड्या बांधून दरीमधून जवळपास २०० मीटर उंच अशा शेतामध्ये नेऊन तिथून ट्रॅक्टर द्वारे पोलीस स्टेशनला नेऊन टाकणे एवढे कठीण परिश्रम घेऊन आरापींना अटक केली होती. जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ व टीम यांनीही कौतुकास्पद कामगिरी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!