जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
जळगाव जामोद: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा, तसेच अरुणोदय क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराची 12 मे पासून सुरुवात झाली आहे. या मध्ये 8 वर्षांपासून ते 18 वर्षांच्या सर्व मुलांना नाम मात्र शुल्क भरून प्रवेश देण्यात येणार आहे.
शहरातील राजा भर्तुहरीनाथ मंदिराजवळ असलेल्या मथाबाई चौकातील अरुणोदय क्रीडा मंडळाच्या प्रशस्त क्रीडांगणावर दररोज सायंकाळी 5 ते 7 या सत्रामध्ये कबड्डी, खो-खो इत्यादी मैदानी खेळ तसेच व्यक्तीमत्व विकास शिबिरांतर्गत, योगा, एरोबिक्स, खेळ दुखापत व प्रथमोपचार, आहार विषयक माहिती इत्यादी बाबत माहिती तज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिरादरम्यान प्रशिक्षक तथा जळगाव जामोद तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद श्रीराम येऊल, क्रीडाशिक्षक प्रतीक राऊत,
वंदना कतोरे, सुरज भगत, आदित्य कपले हे उपस्थित खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करीत आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी व खेळाडूंनी क्रीडा प्रशिक्षक तथा तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येउल मोबाईल क्रमांक 9860207840 / 9970042450 यांच्याशी संपर्क साधावा… सदर शिबिरात खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थी व खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.














