Home बुलढाणा स्टेट बँक कृषी शाखेचा अनागोंदी कारभार

स्टेट बँक कृषी शाखेचा अनागोंदी कारभार

0
105

स्टेट बँक कृषी शाखेचा अनागोंदी कारभार

खाते पुरुषाचे नावाचे तर नोटा अदा करणारे यंत्र (ATM कार्ड) महिला व्यक्तीच्या नावाने

जळगाव जामोद प्रतिनिधी  :-

 

येथील भारतीय स्टेट बँक कृषी शाखा या शाखेत खाते पुरुषाचे नावाचे तर नोटा अदा करणारे यंत्र (ATM कार्ड) महिला व्यक्तीच्या नावाने देण्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर झाले असे कि खातेदार यांनी 15 नोव्हेंबर 2025 ला बचत खाते काढले असता व नोटा अदा करणारे यंत्र (ATM ) काही दिवसात ते टपाल कार्यालयाने दिलेल्या पत्तावर येते परंतु दोन महिने उलटून ही ते आले नसल्याने त्याची चौकशी करण्यासाठी येथील स्थानिक रहिवाशी असलेले अमोल मधुकरराव भगत यांना नोटा अदा करणारे यंत्र (ATM कार्ड) हे आले नाही त्याची विचारणा करायला अनेक वेळा गेले असता संबंधित टेबल वर विचारपूस केली येईल वेळ लागतोच, मुंबई वरून येते टपाल कार्यलयात जाऊन पहा असे उडवा उडावीचे उत्तर दिले तसेच प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर दिले तर कित्येक वेळा संबंधित कर्मचारी आपल्या जागेवर मिळून आले नसल्याने अखेर त्रासून त्यांनी दुय्यम शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांचे नोटा अदा करणारे यंत्र (ATM कार्ड) आले आहे असे सांगून त्याच्या कनिष्ठ कर्मचारी असलेल्या कडे बघा असे सांगितलं ते घेण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांचे नोटा अदा करणारे यंत्र (ATM कार्ड) आले नाही असे उत्तर दिले त्या कर्मचाऱ्यांनी न न चा पाढा वाचला परत दुय्यम शाखा व्यवस्थापक कडे गेले असता त्यांनी त्याच्या जवळच्या कॉम्पुटर मध्ये तपासणी केली असता माझे नोटा अदा करणारे यंत्र (ATM कार्ड) दुसऱ्या महिलेच्या नावावर गेल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी ते नोटा अदा करणारे यंत्र (ATM कार्ड) खाते धारकांना दिले असे अमोल भगत यांनी पत्रकाराना सांगितले.

यावरून या बँकेचा कारभार किती भोंगळ आहे या आधी सुद्धा अश्या घटना घडल्या असतीलच ही शक्यता नाकारता येत नाही तरी या कडे शाखा व्यवस्थापक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी, यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!