Home बुलढाणा न्यायालयामध्ये मराठी भाषा पंधरवडा सेवा दिन साजरा

न्यायालयामध्ये मराठी भाषा पंधरवडा सेवा दिन साजरा

0
412

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

येथील न्यायायालयामध्ये मराठी भाषा पंधरवडा सेवा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानी म्हणून विद्यमान न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती प्रज्ञा मेंढे , प्रमुख वक्ते म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रकाश गवई ,वकील संघाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान हे प्रमुख पाहुणे लाभले होते.

यामध्ये प्राध्यापक गवई यांनी मराठी भाषा व तिची जपवणूक कशी करावी याबद्दल माहिती दिली तसेच मराठी भाषा प्रमाण करण्याचे कारण सुद्धा त्यांनी सांगितले कारण एक प्रमाण भाषा असली तर सगळ्यांना सहज समजेल त्याकरिता प्रमाणभाषा वापरली जाते. परंतु बोलीभाषेला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते कधीही लोप पावू नये तसेच तिचे जतन व आचारणं केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अभिमन्यू वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन म्हणून ॲड. कल्पना डोंगरदिवे यांनी केले तसेच या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी वकील संघाचे सदस्य तसेच पक्षकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!