स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूरच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला परीक्षेत घवघवीत यश
एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा निकाल
मलकापूर प्रतिनिधी किशोर सोनोने:-
स्कूल ऑफ स्कॉलर्स,मलकापूर येथील विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
एलिमेंटरी चित्रकला परीक्षेत कु.विधी पवनकुमार अग्रवाल,तिलक निलेश शर्मा,सोहिल जाफर खान,कु.कृतिका प्रदीप पहाडे, कु.रमणी योगेश डवले, कु.साची रुपेश चौधरी, शेख आयेशा ताहेर, साहिल चौहान, मुशाहिद खान, श्लोक अजय शर्मा, मो.फरहान अन्वर, हुमा कौसर,अल्फिया मुश्ताक व कु.श्रावस्ती विशाल इंगळे या विद्यार्थ्यांनी A ग्रेड प्राप्त केला.विराज प्रविण तायडे याने B ग्रेड, तर कु.श्रावणी रामेश्वर सोनवणे व सिद्धेश अतुल पाटील यांनी C ग्रेड मिळवले.तसेच इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत कु.चंदना प्रविण साळी,कु.यशिका लोकेश संचेती व देवांश विजय तायडे यांनी A ग्रेड, तर कु.सोनाक्षी महावीरसिंह चौहान हिने B ग्रेड मिळवून यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना चित्रकला विभागाच्या शिक्षिका योगिता टावरी यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल स्कूल ऑफ स्कॉलर्सचे अध्यक्ष उल्हासकुमारजी संचेती,संचालक विमलकुमार संचेती, ॲड.श्री.अमरकुमारजी संचेती, मुख्याध्यापिका डॉ.सुदीप्ता सरकार तसेच शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.














