Home बुलढाणा विहिंप विदर्भ प्रांत गोरक्षा प्रमुखपदी नंदकिशोर दलाल यांची नियुक्ती

विहिंप विदर्भ प्रांत गोरक्षा प्रमुखपदी नंदकिशोर दलाल यांची नियुक्ती

0
208

 

 

 

 

 

 

जळगाव जामोद कार्यालय प्रतिनिधी प्रतिनिधी :-

विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षण विभागाच्या विदर्भप्रांत गोरक्षा प्रमुख पदी नंदकिशोर दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र गोरक्षक विभागाचा अभ्यास वर्ग ता. ५ एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी गोरक्षा विभागाचे महाराष्ट्र प्रमुख भाऊराव कुदळे यांनी नंदकिशोर दलाल यांची नियुक्ती केली. दलाल हे विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा संयोजक असून विविध हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. श्री कृष्णाई गोशाळा ट्रस्टचे अध्यक्ष सुध्दा ते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!