मंगेश बहुरूपी जळगाव जामोद :-
बहू प्रतीक्षेत असलेली जळगाव जामोद ते पुणे रातराणी शयनयान बस सेवा हि अखेर १६ मार्च २०२५ ला सुरु झाली. जळगाव जामोद तालुकयातील तसेच जवळ लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील बरेच नागरिक हे पुणे येथे नोकरी च्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्यास आहेत. सणासुदीला हे नागरिक जेव्हा गावी येतात त्यावेळेस ट्रॅव्हल्स मालकांची मनमानी व वाढवलेले दर यामुळे नागरिकांना होणार नाहक त्रास सहन करावा लागत होता. याच कारणामुळे नागरिकांच्या मागणीवरून लेट पण थेट का होईना जळगाव जामोद ते पुणे बहूप्रतीक्षेत
असलेली बस हि दररोज सायंकाळी ६ वाजता जळगाव जामोद बस हि नागरिकांच्या सेवेत हजर राहील . या वेळी चालक जी. पी. पोहरे, चालक वाय. बी. जाधव व वाहक बी.बी. सूर्यवंशी यांचे शाल व श्रीफळ देऊन वाहतूक अधीक्षक निलेश हाडोळे यांनी सत्कार केला.
ऑनलाईन आरक्षण करिता
या बसचे आरक्षण करिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत अँप व संकेत स्थळावरून ऑनलाईन बुक करता येईल
या बस सेवेचा लाभ घेण्याचे आव्हान जळगाव जामोद आगार प्रमुख पवन टाले तसेच वाहतूक अधीक्षक निलेश हाडोळे, वाहतूक निरीक्षक पियुष पाटकर व चालक आणि वाहक यांनी केले आहे.