Home बुलढाणा वडगाव पाटण येथे प्रात्यक्षिक : विध्यार्थीनी पटवून दिले शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा  शीतकक्षाचे...

वडगाव पाटण येथे प्रात्यक्षिक : विध्यार्थीनी पटवून दिले शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा  शीतकक्षाचे महत्त्व

0
119

वडगाव पाटण येथे प्रात्यक्षिक : विध्यार्थीनी पटवून दिले शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा  शीतकक्षाचे महत्त्व

जळगाव जामोद :- प्रतिनिधी
तालुक्यातील
वडगाव पाटण येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत संलग्नित स्वतंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगांव जामोद येथील चतुर्थ वर्षाला शिकणारे विद्यार्थी  यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भाजीपाला टिकवून ठेवण्यासाठी शून्य ऊर्जा शीतकक्ष यावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले व शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाचे फायदे व महत्त्व पटवून दिले.

याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून भाजीपाला जास्तकाळ टिकविणे शक्य होणार आहे.हा प्रकल्प निशुल्क आसून याला तयार करणे हे मात्र अगदी सोपे आहे. तसेच विषयतज्ञ प्रा.अमोल चोपडे यांनी शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतकक्षाचे महत्त्व, उर्जेची होणारी बचत, फायदे यावर मार्गदर्शन करून त्याची माहिती दिली.

प्रात्याक्षिक कार्यक्रमाप्रसंगी वडगाव  गावातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रम घेण्यास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी  प्रा.अविनाश आटोळे, कार्यक्रम समन्वयक प्रा.विद्या कपले व विषयतज्ञ प्रा.अमोल चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी विध्यार्थी भावेश जुमळे, कृष्णा घोगरे ,अभिनव यादव, अजिंक्य पिंजरकर ,सिद्धेश मावळे व गावातील लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!