Home बुलढाणा श्री शिवमहापुराण कथा मनुष्याचे अत्यंत मंगल करणारी कथा – ह भ प...

श्री शिवमहापुराण कथा मनुष्याचे अत्यंत मंगल करणारी कथा – ह भ प निलेश महाराज भुंबरे

0
100

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

स्थानिक रामनगर वाडी खुर्द येथे दिनांक 30 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी शिवमहापुराण कथेचे वाचनकर्ते हभप निलेश महाराज भुमरे आसलगावकर यांनी शिव महापुराण कथेचे महती सांगताना शिवमहापुराण कथा ही मनुष्याचे अत्यंतमंगल करणारी कथा आहे असे सांगितले
जळगाव जामोद शहरातील हरिनाम सप्ताह आयोजक मंडळातर्फे शहरातील रामनगर वाडी खुर्द येथे श्री शिवपुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सदर सप्ताहाची सुरुवात दिनांक 24 जानेवारी रोजी झाली असून आज दिनांक 30 जानेवारी रोजी या सप्ताहाची सांगता झाली दिनांक 31 जानेवारी रोजी ह भ प सारंगधर महाराजांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या सप्ताहात प्रवचन करताना ह भ प निलेश महाराज भुंबरे म्हणाले की अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथेमध्ये संपूर्ण जीवन जगण्याची कला आत्मसात करणाऱ्या माणसाने एकदा तरी शिव पुराण कथा मनुष्य जीवनामध्ये श्रवण करावी शिव म्हणजे मंगलकारी करुणामय भगवान शंकर नेहमी आपल्या भक्तांचे कल्याण त्यांचे दुख ,त्यांचे दरिद्र्य ,रोग यांचा नाश करतात आणि त्यांचं मंगल करतात प्रत्येक ही कथा श्रवण करावी असे प्रतिपादन त्यांनी केले
जळगाव शहरातील शिवपुराण कथा सप्ताह आयोजक मंडळाचे प्रदीप भागवत सर, प्रकाश घोंगटे महाराज,निलेश बोराखडे,मंगेश बावस्कर,श्रीकृष्ण काळे, सतीश वाकेकर, काशीनाथ गणगे,अनिल असंबे, सागर बोचरे, निलेश काचकुरे, श्री टाले,किरण वावटळीकर
व सव॔ राम नगर, आनंद नगर वाडी खुर्द येथील नागरिकांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!