Home बुलढाणा नवीन मंजूर झालेली डीपी त्वरित बसवण्यासाठी अन्न त्याग आंदोलन

नवीन मंजूर झालेली डीपी त्वरित बसवण्यासाठी अन्न त्याग आंदोलन

0
219

नवीन मंजूर झालेली डीपी त्वरित बसवण्यासाठी अन्न त्याग आंदोलन

14 महिने 20 दिवस होऊनही दिले नाही रोहित्र

सहाय्यक अभियंताचा मुजोर पणा

जळगाव जामोद प्रतिनिधी
अमोल भगत

तालुक्यातील निभोरा बु व खेर्डा खुर्द शेतकऱ्याच्या शेतामध्ये जुनी वीज जोडणी असून अस्तित्वात असलेले रोहित्र कमी विदयुत दाबाचे (ओव्हरलोड) दुसरे रोहीत्र (14/02./23.) मंजूर झाले आहे रोहित्र साठी जागा उपलब्ध करून दिली त्याची वरिष्ठा करून तपासणी सुध्या करण्यात आली तरीही सहाय्यक अभियांत्याच्या मुजोर पणा मुळे अजून पर्यंत रोहित्र न दिल्याने शेतकऱ्यांनी आज अखेर अन्न त्याग आंदोलन (उपोषण) सुरु केले
ह्या परिषरातल शेतकऱ्यांनी वेळोवेळी वारंवार संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालकडे चकरा मारून विनवणी सुद्धा केली ह्या शिवारात गहू हरभरा केळी संत्रा तसेच इतरही हंगामी पिके पेरलेली आहे ह्या रिहीत्र वर शेती पंप जास्त झाले त्या मुळे विद्युत दाब जास्त होतो परिणामी विदयुत प्रवाह वारंवार खडीत होतो पिके सुकत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरु केले पिकाची व गुरा ढोरांची आर्थिक हानी झाल्यास एखाद्या शेतकऱ्याची जीवित हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी वीज वितारण कंपनीची राहील.
वीज वितरण कंपनी समोर रमेश शंकरराव देशमुख, गणेश नारायण खंडारे, जंगलूमन ओंकार दामोदर, सिद्धार्थ मोहन तायडे, शालिग्राम तोताराम बहादरे, भास्कर तुकाराम खडारे ज्ञानेश्वर रंगराव खंडारे, शेषराव ओंकार मदनकर, धम्मपाल गोपाल दामोदर अश्या 9 व्यक्ती उपोषणास बसल्या आहे ह्या लोकांच्या सहीने सहाय्यक अभियंता मरा वीज वितरण कंपनी, उपविभाग अधिकारी, (राजस्व ), तहसीलदार,ठाणेदार पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना 28 जानेवारी ला दिले आहे.

वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता (उपकार्यकारी) ह्यांच्या कार्यालया मार्फत असे सांगण्यायात आले की जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडून येणारा निधी अजून पर्यंत झाला नाही त्यामुळे तुम्हाला सध्या रोहीत्र देता येणार नाही.

बी एस चौबरेवाला
सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!