Home बुलढाणा मोटर सायकल चोरट्यास जळगाव जामोद पोलिसांनी केले जेरबंद

मोटर सायकल चोरट्यास जळगाव जामोद पोलिसांनी केले जेरबंद

0
116

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

आसलगाव बाजार येथून दिनांक २५ मार्चला वडशिंगी येथील रामेश्वर भिकाजी वाघ यांची होंडा कंपनीची ड्रीम योगा मोटरसायकल क्रमांक एम एच २८ एएम ९४१४ चोरी गेली होती. यासंबंधीची फिर्याद रामेश्वर वाघ यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला दिल्याने अज्ञात आरोपी विरोधात अप.नं १७५/२०२५ कलम ३०५(२) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार व पोलीस कॉन्स्टेबल मधुकर गाढे यांच्याकडे तपास देण्यात आला होता.पीएस आय नारायण सरकटे,पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत डामरे यांनी तपास जलदगतीने करून अखेर मोटर सायकल चोरट्याचा शोध घेऊन त्या चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.दिनांक २५ एप्रिल रोजी आरोपी संतोष गजानन देविकार वय ३० वर्ष राहणार माळी खेल जळगाव जामोद याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.आरोपी संतोष देविकार याने चौकशी दरम्यान मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले.मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार,पो.काँ.सचिन राजपूत ,पो.कॉ. मधुकर गाढे यांनी केला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत,पो.काँ.मंगेश सोळंके,पो.काँ.संदिप रिंढे,पो.काँ.प्रफ्फुल डब्बे,पो.काँ.स्वप्निल झुंझारकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!