शिबिरात 73 जणांनी केले रक्त दान
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
येथील नाव लोकिक असलेली जळगाव जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिरात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात 73 रक्तदत्त्यांनी रक्त दान करत राष्ट्रीय सेवेत आपला हातभार लावला
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ऍड गिरीष माळपांडे, उपाध्यक्ष नारायणराव पाटील, सचिव नंदकिशोर कथोटे,संचालक भीमा अप्पा खान्देशे, सुरेश दिघडे, सुनील भगत, शालिग्राम मानकर, आणि सर व्यवस्थापक सुधाकर घाटे या मान्यवरची उपस्थिती होती रक्त संकलन डॉ हेडगेवार रक्त संकलन केंद्र अकोला यांच्या पाठकाच्या वतीने डॉ समीर देशमुख, रमेश देशपांडे, आशा कडू, कविता इंगळे, युवराज खोडके, अविनाश पोहरे, आणि सुनील पांडे यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वी रित्या पार पडले या रक्तदानातं नवयुग शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ, युवा हिंद क्रीडा मंडळ व जळगाव जनकल्याण पतसंस्थेचे कर्मचारी व शहरातील नागरिकांनी सुद्धा मोठया प्रमाणात आपला सहभाग नोंदवाला यात मोहन सकळकळे, संदीप अवसरमोल, उज्वल सिंधीकर, संदीप अवचार, विजय ठाकरे, पूर्वेश गुप्ता, श्रीपाद ईश्वरे, प्रशांत भगत या रक्तदात्यानी सुद्धा आपले योगदान दिले
त्या नंतर सर्व रक्तदात्याचे संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी ते साठी सर्व कर्मचारी यांनी प्रयन्त केले














