Home बुलढाणा लग्न, वरात मिरवणुकीदरम्यान डिजे वाजवताय तर घ्यावी लागेल पोलिसांची परवानगी..नाही तर होणार...

लग्न, वरात मिरवणुकीदरम्यान डिजे वाजवताय तर घ्यावी लागेल पोलिसांची परवानगी..नाही तर होणार दंडात्मक कारवाई

0
127

लग्न, वरात मिरवणुकीदरम्यान डिजे वाजवताय तर घ्यावी लागेल पोलिसांची परवानगी..नाही तर होणार दंडात्मक कारवाई

 

जळगांव जा. प्रतिनिधी:-

 

सध्या लग्नसराईची धामधुम सुरु असुन लग्न व वरात मिरवणुकीदरम्यान सर्रासपणे विनापरवाना डि. जे. वाजविल्या जात आहेत. तसेच लग्न व वरात मिरवणुक काढत असतांना संवेदनशिल टिकाणी विनाकारण थांबुन मोठया आवाजात डि. जे. या वादयावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्या जात आहेत. त्यामुळे दोन धर्मामध्ये मोठया प्रमाणात वाद होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. पोलीस स्टेशन तामगांव हददीतील ग्राम पातुर्डा येथे सुध्दा दि. २०/०४/२०२४ रोजी लग्न मिरवणुकीदरम्यान मस्जीदीसमोर डि.जे. वर आक्षेपार्ह गाणे वाजविण्याचे कारणावरुन दोन गटांमध्ये वाद होवुन दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच काल दि. २७/०४/२०२४ रोजी रात्रीदरम्यान पोलीस स्टेशन सोनाळा हददीतील ग्राम टुनकी येथे झालेल्या वरात मिरवणुकीदरम्यान संवेदनशिल ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजविल्याने दोन गटात वाद होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. डि. जे. या वादयाच्या आवाजामुळे नवजात शिशु तसेच वयोवृध्द लोकांचे कानावर व हृदयावर वाईट परिणाम पडत आहेत. पोलीस स्टेशन जळगांव जामोद हददीतील गावामध्ये ज्या ठिकाणी लग्न समारंभ आहेत, त्याठिकाणी लग्न व वरात मिरवणुक काढल्या जात आहेत तसेच मिरवणुकीमध्ये डि.जे.  वादय वाजवित आहेत काय? यावर जळगांव जामोद पोलीसांनी गोपनीय यंत्रणा सक्रिय केली आहे. यापुढे पोलीस स्टेशन जळगांव जामोद हददीतील कुठल्याही गावामध्ये लग्न, वरात व इतर मिरवणुकीदरम्यान डि.जे. हे वादय पोलीसांची पुर्वपरवानगी न घेता त्याचेवर आक्षेपार्ह गाणे वाजवुन दोन धर्मामध्ये वाद होवुन कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास डि.जे. वादय पोलीस स्टेशनला आणुन त्याचेवर कायदेशीर व दंडात्मक अशी कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच लग्न व वरात मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाबाबत एकमेकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील,असे आवाहन जळगांव जामोद ठाणेदार आनंद महाजन यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!