ऑनलाइन फ्री क्लासचे विद्यार्थी नवोदय परीक्षा उत्तीर्ण .
संग्रामपूर :-
जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक कन्या शाळा सोनाळा येथे कार्यरत असलेले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराज यांच्या विचारांनी ग्रासलेले शिक्षक श्री अभिषेक पेटकर सर यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून नवोदय ,स्कॉलरशिप व एन. एम. एम. एस चे क्लास गरजू व सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मोफत (फ्री )क्लास घेत असताना त्यांच्याक्लासचे यावर्षी चार विद्यार्थी विद्यार्थ्यांची नवोदय येथे निवड झाली असून कृष्णा अभिषेक पेटकर ही अमरावती जिल्ह्यामध्ये पहिली तर प्रज्वल गणेश उगले हा एस व्ही आर डी जळगाव जामोदचा विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुसरा अव्वल ठरला .अनमोल विनोद वानखडे सह अंकुर मेहरे यांची निवड झाली. तसेच सरांच्या क्लासचे 16 पैकी 12 विद्यार्थी एन .एम. एम .एस मध्ये पात्र ठरले . एन. एम .एम. यास याचे पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून वर्षाला 12,000 रुपये मिळणार हे विशेष .ज्या गरजू विद्यार्थ्याला सरांचे ऑनलाईन क्लास करायचे असतील त्यांनी या 99757,00685 नंबर वर फोन करावा .असे सरांकडून सांगण्यात येते याकरिता सर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेणार नाहीत .शाळेचे मुख्याध्यापक व गावकरी यांनी सर्वतोपरी सरांना याकरिता सहकार्य केले.














