Home बुलढाणा भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा संपन्न

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा संपन्न

0
153

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा संपन्न

जळगाव जामोद:- प्रतिनिधी

ब्राम्हण समाजाचे आराध्य दैवत

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्री शिव महापुराण व हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी संध्याकाळी जळगाव तालुक्यातील सर्व दिंडी टाळकरी महिला भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत होती भगवान श्री परशुरामाची प्रतिमा ट्रॅक्टरमध्ये ठेवून श्री मानाजी चौक इथून शोभायात्रेला सुरुवात झाली. जुना भाजी बाजार बालाजी गल्ली चावडी चौक दुर्गा चौक चौबारा चौक ते पुन्हा मानाजी चौक येथील विठ्ठल मंदिरामध्ये शोभायात्रेची समाप्ती झाली शोभायात्रे दरम्यान रस्त्यावर सडा व रांगोळी काढण्यात आल्या होत्या शोभा यात्रे सहभागी असणाऱ्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली होती

या सप्ताहामध्ये विविध महाराज यांनी श्री शिव महापुरान कथा सांगितली. या कथेसाठी गावातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या कथेचे आयोजन श्री विठ्ठल मंदिर संस्थान यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!