जळगाव जामोद ( प्रतिनिधी)-अमोल भगत
विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याने मुंबई येथील आझाद मैदानात जंगौ शपथविधी सोहळा संपन्न होत असताना. हा सोहळा येथील दुर्गा चौकात मोठ्या स्क्रीनवर भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाईव्ह बघितला. हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी स्थानिक दुर्गा चौक परिसरामध्ये मोठी गर्दी जमली होती.यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या ठिकाणी जल्लोष साजरा केला. तसेच महायुती सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणार असल्याचे या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
यावेळी भाजपचे रामदास बंबटकार, भाजपा शहर अध्यक्ष कैलास पाटील, भा ज यु मो शहर अध्यक्ष उमेश येऊल, संजय भुजबळ,कैलास डोबे,अभिमन्यू भगत, दिलीप राठी,गोटू खत्ती,बाळू चव्हाण ,आशिष सारसर,शरद खवणे, अजय वंडाळे,राजु हिस्सल,शुभम चंडाले, पांडुरंग मिसाळ, प्रशांत पाटील,बाळु चव्हाण,परम राजपुत,धनंजय देशमुख,राजु गायकी, अनिल ढगे, अमोल भगत, वैभव जाधव योगेश बोंद्रे,अनिल ढगे,योगेश धर्मे,प्रेम डागा ,गोलू फंदाळे यांच्यासह महायुतीचे जळगाव जामोद तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी शहरातील दुर्गा चौक मध्ये उपस्थित होते.














