Home बुलढाणा बँक जागरूकता कार्यशाळा संपन्न

बँक जागरूकता कार्यशाळा संपन्न

0
109

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात बँकिंग जागृती कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गिरीश मायी हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखेचे व्यवस्थापक श्री सचिन खेडकर साहेब, नभिजितसिंग राजपूत नोडल ऑफिसर बुलढाणा ,एसबीआय लाइफ चे श्री सावरकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ऋषिकेश विप्रदास डॉ. गिरीश कुलकर्णी प्रा. सचिन उनटकार, प्रा. नीलिमा भोपळे, प्रा. विनोद बावस्कर हे उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलन व माता सरस्वती आणि संत गाडगेबाबा यांच्या पूजनाने झाली प्रस्ताविक पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ऋषिकेश विप्रदास यांनी करून दिला. बँक जागरूकता याविषयी मार्गदर्शन करताना एसबीआय कृषी शाखेचे व्यवस्थापक सचिन खेडकर यांनी बँकेत वापरल्या जाणाऱ्या विविध स्लिप्स विद्यार्थ्यांमध्ये वाटल्या व त्याचबरोबर स्लिप्स भरायच्या यासंबंधी माहिती दिली पैसे भरण्याची स्लिप्स, पैसे काढण्याची स्लिप्स, एन एफ टी व आरटीजीएसच्या स्लिप्स कशा भरायच्या या संबंधित विद्यार्थ्यांकडून ते भरण्याची प्रात्यक्षिक करून घेतले व सविस्तर मार्गदर्शन केले .
नभिजितसिंग राजपूत यांनी नेट बँकिंग, युनो ॲप, त्याचबरोबर एटीएम मधून पैसे काढताना घेण्याची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच
आपला पैसाची बचत कशी करायची ती सुरक्षित कशी ठेवायची त्यासाठी एसबीआय लाइफचे विविध प्लॅन कोणते आहेत यासंबंधी मार्गदर्शन केले.
अध्यक्ष भाषणात डॉ. गिरीश मायी यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व, तसेच वित्तीय साक्षरतेमुळे आपला पैसा कसा सुरक्षित राहतो याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश जोशी यांनी केले प्रास्ताविक डॉ. ऋषिकेश विप्रदास यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. गोपाल भड यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कु. राधा ठाकरे, कु. वैष्णवी दाभाडे, कु. कीर्ती दाभाडे प्रा. जोशी प्रा. बावस्कर, प्रा. उनटकार श्री गजानन वानखेडे यांनी प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!