Home बुलढाणा विश्व हिंदू परिषदेच्या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत

विश्व हिंदू परिषदेच्या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत

0
102

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

आसलगाव येथे ३१ जानेवारीला विश्व हिंदू परिषदेच्या सामाजिक समरसता रथयात्रेचे थाटात स्वागत गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी रथयात्रेचे गावात आगमन होताच गावकऱ्यांकडून पुष्करुष्ठीचा वर्षाव करण्यात आला. नंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध संत शिरोमणी महाराज व
अण्णाभाऊ साठे या थोर महा पुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन सुद्धा यावेळी करण्यात आले. यावेळी सरपंच विष्णू इंगळे व गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ढोकणे, श्रीकृष्ण भिलके, प्रकाश गावंडे, देविदास घोपे, श्याम देवताडू, माजी सरपंच सुनील डिवरे, संजय तायडे, मधुकर ढोले, सुनील तिवारी, भगवान टापरे, गुणवंता गटमणे, प्रशांत खोकले व समस्त बजरंगी व गावकरी यांच्या हस्ते यावेळी रथ यात्रेचे थाटात स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!