Home बुलढाणा देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारी टोळी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारी टोळी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

0
116

 

जळगांव जामोद (प्रतिनिधी) :-

एक पिस्टल, जिवंत राऊंड, दुचाकी-चारचाकी वाहनांसह १४,०३,५००/–रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुका विदर्भ आणि मध्यप्रदेश च्या सीमारेषेजवळ असून सीमारेषेवरील भाग हा सातपुडा पर्वत रांगानी घनदाट जंगलानी वेढलेला आहे, त्यामुळे या भागात  काळेधंदे जोमात चालतात, त्यामध्ये गावठी कट्टा म्हणजे पिस्तूल, गांजा विक्री, तसेच महाराष्ट्रात प्रतिबंदीत असलेला गुटखा याच  मार्गाने मध्यप्रदेश मधुन महाराष्ट्रात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आणला जातो. इतरही काही काळेधंदे या  मार्गाने राजरोसपणे चालू असतात. आतापर्यंत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने बऱ्याच वेळा बुलढाण्याहून जळगांव जामोद तालुक्यात येऊन प्रतिबंदीत  गुटखा, गांजा तसेच गावठी कट्टे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. तशीच परत एकदा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई दिसून आली. मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीमध्ये बऱ्हाणपूर रोडवर राज्य सिमेलगत काही ईसम देशी   कट्टयाची खरेदी विक्री करणार आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन मा. श्री. सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलढाणा, मा.श्री. अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, मा. श्री. देवराम गवळी- उपविभागीय पोलीस अधिकारी- मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री. अशोक लांडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे आदेश व नेतृत्वामध्ये दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीतील गोराळा धरणाचे जवळ यातील खाली नमुद ४ आरोपी यांना देशी कट्टयाची  (पिस्टल) खरेदी-विक्री व्यवहार चालु असतांना छापा टाकून पकडण्यात आले. तर घटनास्थळावरुन ईतर ४ आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
या  कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींची नांवे..१) मोहम्मद अख्तर शेख मुश्ताक वय ३१ वर्ष रा. वाशिम बायपास, अंबिकानगर, अकोला., २) फहदखान फारुखखान वय २७ वर्ष रा. ७४४/७६ भवानीपेठ, पुणे ,. ३) तौसिफ करीमखान वय ३४ वर्ष रा.३१२ रविवारपेठ, शंका ज्वेलर्सजवळ, पुणे, ४) रामसिंग भवानसिंग मुझाल्दा वय २६ वर्ष रा. निमखेडी ता.. जळगाव जामोद जि. बुलढाणा.

आरोपीं कडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल.. १)एक पिस्टल किं. अं. 30,000/- रुपये,. २) सात नग जिवंत काडतूस (राउंड) किं. अं. ३५००/- रुपये, ३) एक ईन्वोव्हा कार MH-02-AY-8213 किं.अं.१२,००,०००/- रुपये., ४) एक हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल किं.अं. १५,०००/-रुपये, ५) एक पल्सर मोटार सायकल किं. अं. १,००,०००/-रुपये, ६) सहा नग मोबाईल फोन किं. अंदाजे ५५,०००/- रुपये, ७) पिस्टल, राऊंड, इनोव्हा कार, मोटार सायकल व मोबाईल असा एकूण १४,०३,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोला येथील एका आरोपीच्या मध्यस्थीने पुणे येथील दोन आरोपी जळगांव जामोद येथे देशी कट्टा  विकत घेण्यासाठी आले. पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीतील गोडाळा डॅम येथे यातील आरोपीतांचा देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्टल) खरेदी-विक्रीचा व्यवहार चालु असतांना स्था. गु. शाखेच्या पथकाने छापा टाकुन त्यांना पकडले.
सदरची कामगिरी ही मा. श्री सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक, बुलडाणा, श्री अशोक थोरात – अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. देवराम गवळी- उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा यांच्या नेतृत्वात श्री विलासकूमार सानप सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार दिपक लेकुरवाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, गजानन गोरले, चालक पोकॉ विलास भोसले, सायबर पो.स्टे. चे राजु आडवे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!