Home बुलढाणा वंचित बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीने तहसील कार्यालयास पिक नुकसान भरपाईसाठी...

वंचित बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीने तहसील कार्यालयास पिक नुकसान भरपाईसाठी निवेदन..

0
120

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
तालुक्यात मागील दोन दिवस सतंतधार अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. जुलै महीन्यातील पुराने तालुक्यातील शेतीचे कधीही न भरुन येणारे नुकसान केले. तिच भरपाई अजुन मिळाली नाही तुटक्या भरपाई साठी शेतक-यांना खेटे घ्यावे लागत आहे. ई के वाय सी यंत्रणा बंद पडली आहे. तर परत सुल्तानी संकटानंतर अस्मानी संकट येवुन ठाकले. हातातोंडाशी आलेला घास परवाच्या अवकाळी पावसाने हिरावला त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी , जळगांव जा. च्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना तालुकाध्यक्ष संतोष गवई , स्वप्नील गवई जि. सदस्य , देवाभाऊ दामोदर तालुका उपाध्यक्ष , साहेबराव भगत तालुका उपाध्यक्ष , श्रिकृष्ण गवई तालुका  उपाध्यक्ष  , जगदीश हातेकर तालुका अध्यक्ष भबौमहा. प्रा. सुभाष सिरसाट सरचीटणीस , नारायण पारवे जेष्ठ नेते , अमोल तायडे , महादेव बोदडे , बाबुराव पवार सरपंच , श्रीराम भिडे इ पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!